बंद

    प्रस्तावना

    राज्यातील भटक्या जमाती – (ब) प्रवर्गात समावेश असलेला गवळी (मुस्लिम गवळी , गावलान ,ग्वालवंश, गोपाल -गवळी , गवळी-गोपाल ) सामजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत उपकंपनी म्हणून महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र.वनामं २०२४/प्र.क्र.५२/ महामंडळे, दि.०४ मार्च, २०२५ अन्वये श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती मध्ये समावेश असलेला गवळी समाज हा प्रामुख्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या गवळी समाजातील लोकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत राबविल्या जाणा-या विविध योजनांचा (25%बीज भांडवल कर्ज योजना, रु.१.०० लाख थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्षपर्यंत (बँकामार्फत), व गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष ते रु. ५०.०० लक्ष (बँकामार्फत) लाभ मिळून त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत, उपकंपनी म्हणून “श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळाची” स्थापना करण्यात आली आहे.

    श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ या उपकंपनीचे भागभांडवल हे रु. ५०.०० कोटीचे मंजूर करण्यात आले आहे. दरवर्षी या उपकंपनीस विविध योजना राबविण्यसाथी रु. ५.०० कोटी इतके भागभांडवल मंजूर करण्‍यात येईल.